खूप वाट पाहिली होती मी
किती स्वप्न बांधली होती
पावसाच्या सरी सवे
एक परी कथा जगायची होती
तुझा हात धरून भिजायचं होतं
एका छत्रीत बस स्टॉप वर थांबायचं होतं
भिजून आनंदात तू हसताना
एक टक पाहायचं होतं
थांबलो असतो न दोघे आपण
एक कटींग चहा साठी
आणि मग मस्त खाल्ली असती
बशी भरून कांदा भज्जी
बस नाही आली म्हणून
चाललो असतो तुझ्या सवे
घट्ट हात धरून दोघे
म्हणत लाडके गाणे तुझे
दिला असता आधार तुला
तुंबलेल्या रस्त्यातून चालताना
आणि उडवले असते पाणी थोडूसे
तू खिदळत हसत लाजताना
अग गेलो असतो समुद्रावर
बेभान वारा नि उन्मत्त लहर
पाहिला असता सूर्यास्त मस्त
नि तुझ्या गालांचा गुलाबी बहर
आलो असतो न घरापर्यंत
तुला रात्री सोडायला
एकदा तुझ्या डोळ्यात
माझं प्रेम पाहायला
येतो उद्या म्हणालो असतो
मन भरून रडलो असतो
येताना फिरून सारखे
तुलाच पाहत राहिले असतो
पाऊस तसाच होता मुसळधार
स्वप्न हि अगदी तेच होतं
पण वाट बघत बघत कळलं
आज भेटणं व्हायचं नव्हतं
हे सारं व्हायचं नव्हतं"
0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें