गुलाब सांगतो,येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं; 
सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं
नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;  
बकुळी म्हणते,
सावळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं;  
मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुणा॑चा सुगंध मैलवरुन ही येतो;  कमळ म्हणतो,
संकटाच्या चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं  
 
0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें