हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो
समजत नाही, मी घडलो की बिघडलो ?
समजत नाही, मी घडलो की बिघडलो ?
तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो
पैसा हीच शक्ती समजून ईश्वरभक्ती विसरलो
पैसा हीच शक्ती समजून ईश्वरभक्ती विसरलो
सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो
सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो
भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो
धन जमा करताना समाधान विसरलो
तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो
परिक्षार्थी शिक्षणात, हाताचे कौशल्य विसरलो
टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो
जाहिरातीच्या मार्यामुळे चांगलं निवडणं विसरलो
गाडी आल्यापासून चालणं विसरलो
मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो
कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो
संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो
संकरीत खाण्यामुळे पदार्थांची चव विसरलो
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीची ढेकर विसरलो
ए.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो
परफ्युमच्या वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो
चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो
जगाच्या भूगोलात गावाचा इतिहास विसरलो
बटबटीत प्रदर्शनात सौंदर्याचे दर्शन विसरलो
रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो
मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो
स्वतःमध्ये मग्न राहून दुसर्याचा विचार विसरलो
सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो
जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो
ज्योति तुळजापुरकर
0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें