गेलेले ते दिवस परत काही येत नहीं
तरी त्यांना आठवण्याचा सोस माझा सरत नाही ......
रोज शाळा..रोज टवाळ्या..
आईचा मार आणि अश्रूंची धार..
आईचा मार आणि अश्रूंची धार..
छडीचा मार गेला तरी मायेची उब जात नाही....
कितीही टाहो केला तरी..बालपण परत येत नाहीकॉलेज कट्टा आचरट गप्पा
कॅन्टीन ग्रुप मस्ती खूप...
कॅन्टीन ग्रुप मस्ती खूप...
तिच्या बरोबर अनुभावलेला कटिंग चहा, आणि रिमझिम सरी
कितीही भेटल्या आता तरी तिची आठवण विरत नाही
कितीही भेटल्या आता तरी तिची आठवण विरत नाही
विचारलेच जर कधी स्वताला येऊन कुठे पोहोचलोय मी
स्तब्ध -शांतता -हुरहूर-गोंधळ ..उत्तर काही मिळत नाही..
स्तब्ध -शांतता -हुरहूर-गोंधळ ..उत्तर काही मिळत नाही..
पूर्वी मनाला हात घातला की ओल जाणवायची
आता ढगात हात लावला तरी पाउस पडत नाही.....
आता ढगात हात लावला तरी पाउस पडत नाही.....
आधी कोणी 'च्यायला' म्हटलं तरी रडू कोसळायचं....
निगरगट्ट मन आता...एक थेंब हि डोळ्यात नाही....
निगरगट्ट मन आता...एक थेंब हि डोळ्यात नाही....
हरवलाय का मी स्वताला.माझे मला माहित नाही ....
कुठंय तो उनाड मुलगा....कधीपासून भेटलाच नाही....
कुठंय तो उनाड मुलगा....कधीपासून भेटलाच नाही....
सापडलाच तर सांगा मला...तुमच्याही मनात असेल तो....
पण खात्री आहे मला...एक दिवस परत भेटेल तो...
पण खात्री आहे मला...एक दिवस परत भेटेल तो...
0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें